गृह मंत्रालय

2021 च्या जनगणनेच्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा

Posted On: 31 AUG 2018 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2018

 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी महानिबंधक आणि जनगणना आयुक्त कार्यालयाला भेट देऊन तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय गृह सचिव राजीव गऊबा यांच्यासह गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

2021 च्या जनगणनेबाबतच्या पथदर्शी आराखड्याची केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी चर्चा केली. ही जनगणना केल्यानंतर तीन वर्षात या आकडेवारीला अंतिम स्वरुप देता येईल या दृष्टीने या जनगणनेच्या आराखड्यात आणि तंत्रज्ञानात सुधारणा करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

जनगणनेची संपूर्ण आकडेवारी प्रसारित करण्यासाठी सध्या 7 ते 8 वर्षांचा कालावधी लागतो. या जनगणनेसाठी सुमारे 25 लाख प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar

 


(Release ID: 1544668)
Read this release in: English