मंत्रिमंडळ

भारत आणि मोरोक्को दरम्यान हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 29 AUG 2018 3:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि मोरोक्को दरम्यान सुधारित हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे. नवीन हवाई सेवा करार लागू झाल्यानंतर सध्याचा डिसेंबर २००४चा करार लागू नसेल.

 

लाभ:

नवीन हवाई सेवा करार नागरी उड्डाण क्षेत्रात भारत आणि मोरोक्को दरम्यान मैलाचा दगड ठरेल. यामुळे दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणाला चालना मिळेल. दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांना व्यावसायिक संधी पुरवण्याबरोबरच वेगवान हवाई संपर्कासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध होईल.

 

विवरण:

कराराची प्रमुख वैशिष्ट्ये:-

१. प्रत्येक देशाच्या अनेक विमान कंपन्या असतील.

२. प्रत्येक देशाची नियुक्त विमान कंपनी त्याच देशाच्या, अन्य देशाच्या किंवा त्रयस्थ देशातील विमान कंपनीबरोबर  विपणन व्यवस्थेसाठी करार करू शकतील.

३. हवाई सेवेच्या विक्री आणि प्रोत्साहनासाठी  दोन्ही देशांच्या विमान कंपन्या परस्परांच्या देशात कार्यालये स्थापन करू शकतील.

४. एएसए ने निर्धारित केलेल्या मार्गातील सहा ठिकाणांहून/कडे दोन्ही देशांच्या विमान कंपन्या अमर्यादित उड्डाणे करू शकतात. भारतीय विमान कंपन्या मोरोक्कोच्या कासाब्‍लांका, रबात, माराकेश, अगादीर, तांगीर आणि फेज येथे येण्याजाण्यासाठी सेवा पुरवू शकतील. तर मोरोक्कोच्या विमान कंपन्या दिल्‍ली, मुंबई, कोलकाता, चेन्‍नई, बेंगलूरू आणि हैदराबाद येथे ये-जा करू शकतील.

5. हवाई सेवा करारात विमान सेवेच्या परिचालनाची अनुमती, संचालन नियम, व्यावसायिक संधी, सुरक्षा संबंधित कलमे मागे घेण्याची किंवा रद्द करण्याची तरतूद आहे.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1544302) Visitor Counter : 95


Read this release in: English