जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय
लखवार बहुपयोगी प्रकल्पाच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विभिन्न राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यात सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2018 2:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2018
केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर या सर्वांशी आज लखवार बहुपयोगी प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार केला. केंद्र सरकार आणि या सर्व राज्यांच्या सहकार्याने डेहराडूनजवळ यमुना नदीवर लखवार बहुपयोगी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 3,966.51 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे या सर्व राज्यात पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटेल, असे गडकरी यावेळी म्हणाले.
या प्रकल्पाअंतर्गत यमुना नदीवर लोहारी गावात 204 मीटर उंचीचे धरण बांधले जाणार आहे. या धरणामुळे आसपासच्या भागात 33,780 हेक्टर जमिनीवर शेतीसाठी जलसिंचनाची सोय होणार आहे. तर 78.83 द.ल.घ.मीटर पाणी या सहा राज्यांमध्ये पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी केला जाईल. या प्रकल्पातून 300 मेगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. उत्तराखंड जलविद्युत निगम हा ऊर्जा प्रकल्प राबवणार आहे. केंद्र सरकार आणि सहा राज्ये मिळून या प्रकल्पाचा खर्च करतील.
या प्रकल्पाला 1976 साली पहिली मंजुरी देण्यात आली होती. मात्र, अनेक कारणांनी प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नाही.
N.Sapre/R.Aghor/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1544122)
आगंतुक पटल : 88
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English