जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

लखवार बहुपयोगी प्रकल्पाच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या विभिन्न राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सामंजस्य करार करणार

या प्रकल्पामुळे ऊर्जा निर्मिती आणि सिंचनात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा

प्रविष्टि तिथि: 27 AUG 2018 6:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2018

 

केंद्रीय जलसंपला, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी उद्या उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हरयाणा, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी सामंजस्य करार करणार आहेत. केंद्र सरकार आणि या सर्व राज्यांच्या सहकार्याने डेहराडूनजवळ यमुना नदीवर लखवार बहुपयोगी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 3,966.51 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या प्रकल्पाअंतर्गत यमुना नदीवर लोहारी गावात 204 मीटर उंचीचे धरण बांधले जाणार आहे. या धरणामुळे आसपासच्या भागात 33,780 हेक्टर जमिनीवर शेतीसाठी जलसिंचनाची सोय होणार आहे. तर 78.83 द.ल.घ.मीटर पाणी या सहा राज्यांमध्ये पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी केला जाईल. या प्रकल्पातून 300 मेगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. उत्तराखंड जलविद्युत निगम हा ऊर्जा प्रकल्प राबवणार आहे. केंद्र सरकार आणि सहा राज्ये मिळून या प्रकल्पाचा खर्च करतील.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1544065) आगंतुक पटल : 110
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English