पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

जम्मू-काश्मीरमध्ये स्वच्छ भारत अभियानाचा केंद्र सरकारकडून आढावा

Posted On: 22 AUG 2018 4:45PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2018

 

पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांनी काल श्रीनगर येथे जम्मू काश्मीरमधल्या स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणचा आढावा घेतला. सर्व जिल्हा उपायुक्तांसमवेत आढावा घेतल्यानंतर, संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा पुढच्या महिन्यापर्यंत करण्यात येईल असे आश्वासन राज्याने केंद्रीय पथकाला दिला.

याआधी अय्यर यांनी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांची भेट घेऊन स्वच्छता आणि संबंधित मुद्यांवर राज्याच्या प्रगतीबाबत चर्चा केली.

सीमेजवळच्या कुपवाडा या विकासआकांक्षी जिल्ह्याला अय्यर यांनी भेट दिली आणि खेड्यातल्या स्वच्छताविषयक प्रगतीचा आणि इतर मानकांचा आढावा घेतला आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. श्रीनगरमधल्या महत्त्वाच्या पाणी पुरवठा सयंत्रालाही त्यांनी भेट दिली.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1543705) Visitor Counter : 65


Read this release in: English