पंतप्रधान कार्यालय

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत सामूहिक ई गृहप्रवेश

Posted On: 23 AUG 2018 3:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2018

 

गुजरातमधल्या वलसाड जिल्ह्यातल्या जुझवा गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री अवास योजना (ग्रामीण)च्या लाभार्थ्यांचा सामूहिक गृहप्रवेश झाला. राज्यातल्या 26 जिल्ह्यातल्या लाभार्थींकडे एक लाखाहून जास्त घरे सुपूर्द करण्यात आली. विविध जिल्ह्यातले लाभार्थी वलसाड जिल्ह्यातल्या मुख्य कार्यक्रमाशी व्हिडिओ लिंकद्वारे जोडण्यात आले होते. त्यातल्या काही लाभार्थींशी पंतप्रधानांनी संवाद साधला. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामोदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका, अभियान यासह विविध विकास योजनांच्या निवडक लाभार्थींना पंतप्रधानांच्या हसते प्रशस्तीपत्र आणि नियुक्तीपत्र देण्यात आली. महिला बँक सहाय्यकांना नियुक्ती पत्र आणि मिनी एटीएमचे वाटपही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

रक्षा बंधनाचा सण जवळ आला असे नमूद करून सुमारे एक लाख महिलांना त्यांच्या नावाचे घर मिळाले याबद्दल समाधान व्यक्त करतानाच ही रक्षाबंधनाची भेट असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नवे घर, नवी स्वप्ने घेऊन येते आणि त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्या कुटुंबाला नवा उत्साहही देते असे ते म्हणाले. ई गृहप्रवेशाच्यावेळी पाहिलेली ही घरे उत्तम दर्जाची दिसत असून मध्यस्थ नसल्यामुळेच हे शक्य झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 2022 पर्यंत ‘सर्वांसाठी घर’ या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

राजकारणी लोकांनी बांधलेल्या ऐटबाज घरांची चर्चा आधीपासून होत असे मात्र आता काळ बदलला असून गरीबांना त्यांची स्वत:ची घरे मिळत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

गरीबांना त्यांचे स्वत:चे घर, वीज, स्वच्छ पेयजल, स्वयंपाकासाठी स्वच्छ ऊर्जा पुरवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी सरकार कसे कार्यरत आहे याचा तपशील पंतप्रधानांनी दिला.

अस्तोले पाणी पुरवठा योजनोचे भूमीपूजन पंतप्रधानांनी केले. ही पाणी पुरवठा योजना म्हणजे अभियांत्रिकी निर्मितीतला चमत्कार आहे असे सांगून पेयजल, लोकांना विविध आजारांपासून बचाव करते.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1543681) Visitor Counter : 109


Read this release in: English