रेल्वे मंत्रालय

केरळमधल्या पूरग्रस्तांना मदतीसाठी रेल्वेची सर्वतोपरी मदत

Posted On: 21 AUG 2018 6:49PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2018

 

केरळमध्ये झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे 36 धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे दक्षिण रेल्वेच्या तीन विभागांना फ्लॅश फ्लड, भूस्खलन, रुळावर दरडी कोसळल्याच्या संकटांना सामोरे जावे लागले. रेल्वेच्या पथकाने अहोरात्र निष्ठेने काम करून केरळमधल्या मुख्य मार्गावरचे सर्व विभाग 20 ऑगस्टपासून सुरू केले. मुख्यालय आणि विभागीय पथकात 30 अधिकारी, 45 सुपरवायझर आणि साडेचारशे रेल्वे कर्मचाऱ्यांनी यासाठी अथक परिश्रम केले.

काही गाड्यांचा अपवाद वगळता जवळजवळ सर्व रेल्वे फेऱ्या आजपासून पूर्ववत करण्यात आल्या आहेत.

अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी तिरुवनंतपुरम आणि पलक्कड विभागत 61 विशेष प्रवासी गाड्या चालवण्यात येत आहेत तर मदुराईमार्गे एर्नाकुलम ते तिरुवनंतपुरम दरम्यान 13 विशेष एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात आल्या.

आयआरसीटीसीकडून तिरुवनंतपुरम विभागामार्फत तीन लाख रेल्वे नीर बाटल्या केरळला पुरवण्यात येत आहेत.

रेल्वेने केरळच्या मदतीसाठी छत्तीसगडकडून पुरवला गेलेला विविध सरकारी आणि नामवंत संस्थांनी पुरवलेल्या मदत सामग्रीची विनाशुल्क वाहतूक केली.

पाणी शुद्ध करण्यासाठीची यंत्रणा, वैद्यकीय मदत यासह इतर आवश्यक गोष्टी पुरवण्यासाठी दक्षिण रेल्वेने मदतीचा हात पुढे केला आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1543558) Visitor Counter : 123


Read this release in: English