आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केरळमध्ये पुरामुळे बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत सुरू-जे.पी.नड्डा

Posted On: 19 AUG 2018 5:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मंत्रालय, केरळमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वतोपरी सहाय्य करत आहे. केरळमधल्या परिस्थितीवर आपले मंत्रालय देखरेख ठेवत आहे. आरोग्य सचिव, रोग नियंत्रण यंत्रणेद्वारे, राज्याच्या आरोग्य यंत्रणांशी दररोज संपर्क करत असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली असून आपण स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.

3757 वैद्यकीय मदत शिबिरे लावण्यात आली आहेत. राज्य सरकारने विनंती केल्यानुसार 90 प्रकारची औषधे, राज्य सरकारने मागितलेल्या प्रमाणात केरळला पाठवली जात आहे.  औषधांचा पहिला हप्ता उद्या पोहोचत आहे. पुरवठा वाढावा या दृष्टीने आरोग्य मंत्रालय, इतर राज्यांशी समन्वय साधत असल्याचे ते म्हणाले.

संसर्गजन्य रोगांचा प्रसार आणि नियंत्रण, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता उपाययोजना इत्यादींबाबत आरोग्य विषयक सूचना तयार करण्यात आल्या असून त्या राज्य सरकारलाही पाठवण्यात आल्या आहेत.

पुराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर रोगांचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपातकालीन वैद्यकीय मदत देण्यासाठी जलद प्रतिसाद आरोग्य पायाभूत सुविधा सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सहाय्य पुरवण्यात येणार आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1543416) Visitor Counter : 67


Read this release in: English