गृह मंत्रालय

केरळमधील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एनसीएमसीची दोन दिवसात दुसऱ्यांदा बैठक

Posted On: 17 AUG 2018 2:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2018

 

केरळमधील पूरग्रस्त भागातील मदत आणि बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची दोन दिवसांत आज दुसऱ्यांदा बैठक झाली. केंद्रीय सचिव पी.के.सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली केरळ आणि तामिळनाडूच्या मुख्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला. लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या अतिरिक्त तुकड्या केरळमध्ये तैनात करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

केंद्रीय सचिवांनी या संघटनांना बोटी, हेलिकॉप्टरर्स, लाईफ जॅकेट, रेनकोट, गमबूट आदी सामग्री पुरवण्याचे निर्देश दिले. पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोटरबोटी पाठवण्याची विनंती केरळच्या मुख्य सचिवांनी केली होती.

आत्तापर्यंत केंद्र सरकारने 339 मोटरबोटी, 2800 लाईफ जॅकेट, 1400 तरंगत्या पेट्या, 27 लाईट टॉवर्स आणि 1000 रेनकोट्स वितरित केले आहेत. 1,00,000 अन्न पदार्थांची पाकिटे वितरित करण्यात आली असून आणखी 1,00,000 पाकिटं पुरवली जात आहेत. दुधाची भुकटी पुरवण्याचा प्रयत्नही केला जात आहे.

भारतीय नौदलाने पोहणाऱ्या पथकांसह 51 बोटी तैनात केल्या असून 1,000 लाईफ जॅकेट आणि 1300 गम बूट पाठवले आहेत.

तटरक्षक दलानेही बचाव पथकासह 30 बोटी पाठवल्या आहेत.

हवाई दलाने 23 हेलिकॉप्टर्स आणि 11 विमान तैनात केली आहेत.

लष्कराने 10 तुकड्या, 10 ईटीएफ, 60 बोटी आणि 100 लाईफ जॅकेट्‌स पाठवली आहेत.

एनडीआरएफने 43 बचाव पथकं आणि 163 बोटी पाठवल्या आहेत.

रेल्वेने 1,20,000 पाण्याच्या बाटल्या पुरवल्या आहेत. त्याचबरोबर 2.9 लाख लीटर पिण्याचे पाणी घेऊन जाणारी विशेष रेल्वेगाडी उद्या कयाकुलम येथे पोहोचेल.

पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची उद्या पुन्हा बैठक होणार आहे.  

 

 

N.Sapre/S.Kane/P.Malandkar



(Release ID: 1543280) Visitor Counter : 143


Read this release in: English