इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
माहिती संरक्षण विधेयकाच्या मसुद्यावर नागरिकांकडून सूचना मागवल्या
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2018 5:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2018
माहितीचे संरक्षण आणि नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व ओळखून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन केली आहे.
या तज्ञ समितीने आपला अहवाल सादर केला असून वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा http://meity.gov.in/data-protection-framework या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या मसुद्याबाबत सामान्य नागरिकांकडून 10 सप्टेंबरपर्यंत सूचना-प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत.
Meity.gov.in या मंत्रालयाच्या पोर्टलवर प्रतिक्रिया पाठवता येतील. तसेच अपवादात्मक प्रकरणी, टपालाने पुढील पत्त्यावर पाठवता येतील.
संयुक्त सचिव,
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय,
खोली क्र. 4016, इलेक्ट्रॉनिक्स निकेतन,
6, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी मार्ग, नवी दिल्ली 110003
N.Sapre/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1543193)
आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English