वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांक (आधार: 2011-12=100)

Posted On: 14 AUG 2018 1:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  14 ऑगस्ट 2018

 

जुलै 2018 मध्ये घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वाढून 119.7 (अंदाजे) इतका राहिला.

चलनवाढ

घाऊक किंमतीवर आधारित चलनवाढीचा दर जुलै 2018 मध्ये 5.09 टक्के राहिला. जून 2018 मध्ये हा दर 5.77 टक्के तर जुलै 2017 मध्ये 1.88 टक्के होता.

प्राथमिक वस्तू

या प्रमुख गटाचा निर्देशांक जुलै महिन्यात 1.3 टक्के वाढून 134.9 इतका राहिला.

इंधन आणि वीज

या प्रमुख गटाचा निर्देशांक जुलै महिन्यात 0.3 टक्के वाढून 104.4 इतका राहिला.

उत्पादित वस्तू

या प्रमुख गटाचा निर्देशांक 0.1 टक्के वाढून 117.4 इतका राहिला.

घाऊक किंमतीवर आधारित अन्नधान्य चलनवाढीचा दर जुलैमध्ये वाढून 0.86 टक्के इतका राहिला. जूनमध्ये हा दर 1.56 टक्के होता.

मे महिन्याचा अंतिम निर्देशांक

मे महिन्यात घाऊक किंमतींवर आधारित निर्देशांक 118.3 तर चलनवाढीचा दर 4.78 टक्के इतका राहिला.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1542949) Visitor Counter : 73


Read this release in: English