पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या रवांडा भेटीदरम्यानचे संयुक्त निवेदन

Posted On: 24 JUL 2018 11:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 जुलै 2018

 

1. रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23-24 जुलै 2018 रोजी रवांडाला भेट दिली.पंतप्रधानांसमवेत,भारत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले उच्च स्तरीय शिष्टमंडळ होते.भारतातले मोठे व्यापारी मंडळही त्यांच्यासमवेत होते. रवांडाला भेट देणारे हे पहिले भारतीय पंतप्रधान होते.

2. राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे यांनी 2017 मध्ये व्हायब्रन्ट गुजरात मध्ये सहभाग घेण्यासाठी भारताला भेट दिली आणि 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या स्थापना परिषदेसाठी भारताला भेट दिली.भारताच्या उप राष्ट्रपतींनी रवांडाला 2017 मध्ये भेट दिली.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्षासमवेत स्टेट हाउस किगाली इथे सोमवारी 23 जुलै 2018 रोजी द्विपक्षीय चर्चा केली.राष्ट्राध्यक्षानी, पंतप्रधानांच्या सन्मानार्थ विशेष भोजन समारंभाचे आयोजन केले होते.

4. शिष्टमंडळ स्तरावर चर्चा, भारतीय समुदायाशी बातचीत, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स (एफआईसीसीआई) आणि रवांडा डेव्हलपमेंट बोर्ड (आरडीबी) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या व्यापार कार्यक्रमात संबोधन यांचा पंतप्रधानांच्या कार्यक्रमात समावेश होता. पंतप्रधानांनी, गीसोजी नरसंहार स्मारक आणि तुत्सी च्या विरोधात 1994च्या नरसंहारातल्या पीडितांच्या स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी,24 जुलै रोजी किगालीबाहेर असलेल्या रवारू आदर्श गावात ‘गिरीन्का कार्यक्रमात’ एक परिवार एक गाय’या सामाजिक संरक्षण योजनेत सहभाग घेतला आणि या योजनेत भारताचे योगदान म्हणून गाई भेट दिल्या. या भेटीची प्रशंसा केली गेली.    

5. चर्चेदरम्यान दोन्हीही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याची समीक्षा केली आणि धोरणात्मक भागीदारीच्या संदर्भात रवांडा आणि भारत यांच्यातल्या उत्कृष्ट संबंधाप्र्ती संतोष व्यक्त केला. 2018 मधे आफ्रिकेत उघडण्यात आलेल्या 18 निवासी भारतीय मिशन मधे रवांडा प्रथम होता असे सांगून यामुळे भारत रवांडासमवेत असलेल्या संबंधाना देत असलेले महत्व अधोरेखित होत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. राष्ट्राध्यक्ष पॉल कागामे यांनी याचे स्वागत केले.2018 मधे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या संस्थापक संमेलनात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष कागामे  यांनी केलेल्या भारत दौऱ्याचे स्मरण करत, पंतप्रधानांनी, रवांडाद्वारे  आय एस ए करारावर त्वरित हस्ताक्षर केल्याबद्दलआणि अनुमोदन दिल्याबद्दल प्रशंसा केली. राष्ट्राध्यक्ष कागामे  यांच्या नेतृत्वाखाली रवांडाचा विकास  आणि परिवर्तनाची त्यांनी प्रशंसा केली. 44 देशांनी स्वाक्षऱ्या आफ्रिकी महाद्विपीय मुक्त व्यापार क्षेत्र कराराला राष्ट्राध्यक्ष पूल कागामे अंतिम रूप देण्यात आफ्रिकी संघाचे अध्यक्ष या नात्याने बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल पंतप्रधानांनी त्याना धन्यवाद दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाद्वीपाचे आर्थिक एकीकरण प्रगतीपथावर राहण्यासाठी मार्गदर्शन मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.आफ्रिकी संघाबरोबर संबंध दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

6. राष्ट्राध्यक्ष कागामे यांनी, रवांडा समवेत आणि अन्य आफ्रिकी देशांसमवेत दृढ विकास सहयोगासाठी भारताचे आभार मानले. रवांडाला एक्झिम  बँकेमार्फत भारताने पुरवलेल्या सुमारे 400 दशलक्ष अमेरिकी डॉलर कर्जाच्या आधारे राबवण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे लाभ झाला (जलविद्युत, कृषी, कौशल्य विकास, पायाभूत), याशिवाय इतर अनेक मोठे प्रकल्प (व्हिटीसी, सौर विद्युतीकरण) आणि प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम (आयटीईसी, आयसीसीआर, आयएएफएस) यातूनही लाभ झाला. भारताने डिजिटल समावेशकतेसाठी राबवलेल्या उपक्रमाच्या धर्तीवर रवांडातही असे उपक्रम राबवण्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली.आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्यासाठी भारताच्या नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली.

7. ई लायब्ररी च्या सुविधेसह डिजिटल शिक्षण क्षेत्रात कृती दल स्थापन करत आल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यामुळे रवांडाच्या शिक्षण क्षेत्राला याचा लाभ होणार असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष कागामे यांनी या घोषणेचे स्वागत केले.

8. पंतप्रधानांनी, भारतीयांसाठी दीर्घ मुदतीचा व्यापारी व्हिझा आणि वर्क परमिटविषयी सूचना केली, त्यावर रवांडामध्ये येणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांना सुलभ प्रवास करता यावा यासाठी यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन राष्ट्राध्यक्ष कागामे यांनी दिले.

9. चर्चेप्रमाणे, दोन्ही नेत्यांनी -

-द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी आपल्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केला.

उभय देशातल्या जनते-जनतेमधला संवाद वाढवण्याला प्रोत्साहन देण्याला मान्यता

-आफ्रिकेतील यूएनपीकेएफ मध्ये मोठे योगदान देणारे देश म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैन्यातले सहकार्य अधिक दृढ करण्याला मान्यता

-ऊर्जा क्षेत्रात सहकार्याच्या संधींचा शोध घेण्यासाठी विचार करण्याला मंजुरी

-आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याला मान्यता

-पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुभव आणि तज्ज्ञांचे आदान-प्रदान करण्याचा निर्णय

10. दोन्ही नेत्यांनी कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचा निषेध केला आणि दहशतवादाच्या कोणत्याही कृत्याचा, मग ते कोणत्याही उद्देशाने केलेले असो, कोणीही आणि कुठेही केलेले असो त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही यावर उभय नेत्यांनी भर दिला. या संदर्भात दोन्ही नेत्यांनी सीमापार दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त केली आणि दहशतवाद रोखण्यासाठी आणि त्याविरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांच्या महत्वावर भर दिला.

11. हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक शांतता आणि सुरक्षितता,शाश्वत विकास यांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर बहुविध संस्थांमध्ये सहकार्य अधिक वाढवण्याप्रती या नेत्यांनी आपल्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केला.

12. या भेटीदरम्यान खालील सामंजस्य करार/ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या-

-संरक्षण सहकार्य सामंजस्य करार

-द्विपक्षीय व्यापार करार

-भारतातल्या आयसीएआर(राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था) आणि रवांडाच्या कृषी आणि पशु संसाधन विकास मंडळ,किगाली यांच्यात दुग्धविषयक सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार

-भारतातल्या केंद्रीय चामडे संशोधन संस्था (सीएल आरआय) आणि रवांडातली राष्ट्रीय औद्योगिक संशोधन आणि विकास एजन्सी ( एन आय आर डी ए) यांच्यातला सामंजस्य करार

-सांस्कृतिक आदान- प्रदान विषयक सामंजस्य करार

-कृषी आणि पशु संसाधन सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारात सुधारणा

-किगाली सेझ च्या विस्तारासाठी आणि औद्योगिक पार्कच्या विस्तारासाठी 100 दशलक्ष डॉलरचा कर्ज विषयक करार

-कृषी प्रकल्प योजनांच्या घटकांसाठी 100 दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या कर्जासाठीचा करार

13. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोषणा केल्या-

-रवांडा सरकारच्या गिरीन्का कार्यक्रमाला सहकार्य करण्याकरिता रवांडा ला 200,000 अमेरिकी डॉलरची भेट

-एन सी ई आर टी कडून 100000 पुस्तकांची भेट आणि डिजिटलायझेशन साठी सहकार्य पुरवणे आणि शैक्षणिक पुस्तके आणि संबंधित शिक्षण विषयक साहित्यासाठी ऑन लाईन एक्स्कीस

-किगालीमधे उद्योजकता विकास केंद्र उभारणे, या केंद्रातून रवांडामधल्या युवकांना विविध क्षेत्रात त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

-दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात, अल्प मुदतीच्या प्रशिक्षणासाठी, निधीचे पाठबळ असलेले 25 स्लॉट.

-किगाली इथले गीसोजी नरसंहार स्मारक आणि मुलींच्या शिक्षणासाठी रवांडाच्या फर्स्ट लेडी यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या इम्बुटो फाउंडेशन साठी प्रत्येकी 10,000 अमेरिकी डॉलर्सचे योगदान

-रवांडातल्या वास्तव्यात आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाच्या स्नेहपूर्ण आतिथ्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष कागामे यांचे आभार मानले आणि राष्ट्राध्यक्ष कागामे यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1542891) Visitor Counter : 66


Read this release in: English