महिला आणि बालविकास मंत्रालय

60 हजार महिला फेसबुकच्या साहय्याने डिजिटल साक्षर

Posted On: 10 AUG 2018 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2018

 

राष्ट्रीय महिला आयोगाने फेसबुक आणि झारखंडमधल्या रांची येथील सायबर पीस फाउंडेशनच्या सहकार्याने महाविद्यालय/विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरता उपक्रम सुरु केला आहे. महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेला चालना देणे, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता, त्यांची हाताळणी व ते रोखणे याबाबत जागरुकता निर्माण करणे, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. देशातल्या महत्वाच्या शहरांमधल्या विद्यापीठातल्या 60 हजार महिलांना इंटरनेट, सोशल मिडिया आणि ई-मेलच्या सुरक्षित वापराबाबत याअंतर्गत माहिती देण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी आज लोकसभेत एका उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1542668) Visitor Counter : 88


Read this release in: English