वस्त्रोद्योग मंत्रालय

विकसीत रेशीम बीजाच्या जाती अधिसूचित

Posted On: 10 AUG 2018 5:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2018

 

रेशीम किड्यांच्या कोशाची उत्पादकता वाढून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी अलकडेच विकसित केलेल्या मलबेरी आणि वान्या रेशीमबीजांच्या अलीकडेच विकसित केलेल्या जाती केंद्रीय रेशीम मंडळाने अधिसूचित केल्या आहेत. उत्पादकता वाढावी यासाठी हवामानाला अनुकूल रेशीम किड्यांची पैदास आवश्यक असते.

पारंपारिक डाबा जातीपेक्षा मंडळाने विकसित केलेल्या ट्रॉपिकल टसर जातीत 21 टक्के अधिक उत्पादकता आहे. या जातीबरोबरच मल्टीव्होल्टाइन x बायव्होल्टाइन मलबेरी हायब्रीड आणि एरी सिल्कवर्म (सी 2) या जाती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या आहेत.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 


(Release ID: 1542634)
Read this release in: English