रेल्वे मंत्रालय

2574 नवे रेल्वेमार्ग केवळ चार वर्षात

महाराष्ट्रात 39 किमीचे नवे मार्ग

Posted On: 10 AUG 2018 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2018

 

देशात 2014 पासून 30 जून 2018 या चार वर्ष तीन महिन्यांच्या कालावधीत 2,574 किलोमीटरचे नवे मार्ग बांधण्यात आले आहेत. रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

महाराष्ट्रात 39 किलोमीटरचे नवे मार्ग बांधण्यात आले आहेत. झारखंडमध्ये 439, उत्तर प्रदेशात 262 तर कर्नाटकमध्ये 240 किलोमीटरचे नवे मार्ग बांधण्यात आले.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar



(Release ID: 1542631) Visitor Counter : 87


Read this release in: English