राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी केले “एक जिल्हा एक उत्पादन” परिषदेचे उद्‌घाटन

Posted On: 10 AUG 2018 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2018

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज उत्तर प्रदेशातल्या लखनौ येथे एक जिल्हा एक उत्पादन परिषदेचे उद्‌घाटन केले.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असून हे उद्योग समावेषक विकासाची इंजिने आहेत. ही क्षेत्र कमी भांडवली खर्चात अधिक रोजगारनिर्मिती करतात. महत्वाचे म्हणजे ग्रामीण आणि मागास क्षेत्रात ही क्षेत्रे रोजगारनिर्मिती करतात, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

एक जिल्हा एक उत्पादन योजनेमुळे स्थानिकांमध्ये कौशल्य वृद्धी होईल. तसेच उत्तर प्रदेशातील कारागिरांची आर्थिक भरभराट होईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

एक जिल्हा एक उत्पादन योजनेंतर्गत पाच वर्षात 25 हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य पुरवून 25 लाख नागरिकांना रोजगार पुरवण्याचे लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे. या योजनेमुळे उत्तर प्रदेशाच्या समावेशक आणि शाश्वत विकासाला बळकटी मिळेल, अशी आशा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar



(Release ID: 1542626) Visitor Counter : 138


Read this release in: English