मंत्रिमंडळ

झारखंडच्या करमा येथे नवे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे व जुन्या केंद्रीय रुग्णालय स्थलांतरणासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

Posted On: 09 AUG 2018 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2018

 

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयांतर्गत झारखंडमधल्या करमा येथे असलेले केंद्रीय रुग्णालय, नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन आणि इमारतीसह झारखंड सरकारला नि:शुल्क हस्तांतरित करायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे महाविद्यालय सध्याच्या जिल्हा/रेफरल रुग्णालयांशी संलग्न असतील आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करेल.

केंद्रीय रुग्णालय तीन महिन्यांच्या आत जमीन आणि इमारतीसह राज्य सरकारला हस्तांतरित केले जाईल.

यामुळे देशात प्रशिक्षित डॉक्टरांच्या संख्येत वाढ होईल तसेच क्षेत्रातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधेत सुधारणा व्हायला मदत होईल.

असंघटित क्षेत्रातल्या काही वर्गातल्या मजुरांना आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना श्रम आणि रोजगार मंत्रालय आपल्या रुग्णालय आणि दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरवते. खाण आणि विडी कामगारांसाठी करमा येथे 150 खाटांचे रुग्णालय मंत्रालयाने उभारले आहे.नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी ते हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव झारखंड सरकारने ठेवला आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1542559) Visitor Counter : 94


Read this release in: English