आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

बिहारमधील फुलौत येथील कोसी नदीवर 4 पदरी नवीन पूल बांधायला मंत्रिमंडळाची मंजुरी


फुलौत ते बिहपुर दरम्यानचे अंतर 72 किलोमीटर वरून 12 किलोमीटर पर्यंत कमी होणार

बिहारमध्ये राष्‍ट्रीय महामार्गाच्या बीरपुर-बिहपुर टप्प्याचे उन्‍नयन आणि पुनर्वसनाला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 09 AUG 2018 6:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2018

 

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने  बिहार मधील फुलौत येथे  6.930 किलोमीटर लांबीच्या  4 पदरी पुलाच्या बांधकाम प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. समितीने बिहारमध्ये राष्‍ट्रीय महामार्ग -106 च्या सध्याच्या बीरपुर-बिहपुर मार्गावर 106 किलोमीटर ते  136 किलोमीटर पर्यंत  ‘पेव्‍ड शोल्‍डरसह दोन पदरी ’ मार्गाच्या उन्‍नयन आणि पुनर्वसनासाठी 1478.40 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली. या प्रकल्पाचा बांधकाम कालावधी ३ वर्षे असून जून 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

प्रभाव :

राष्‍ट्रीय महामार्ग- 106 वर  फुलौत आणि बिहपुर दरम्यान  10 किलोमीटर लांब रस्ता अस्तित्वात नाही आणि तो कोसी नदीच्या क्षेत्रात येतो. सध्या फुलौतहून बिहपुरला जाण्यासाठी सुमारे 72 किलोमीटर प्रवास करावा लागतो. या प्रकल्पाअंतर्गत  कोसी नदीवर  4-पदरी हा नवा पूल तयार झाल्यावर  फुलौत आणि  बिहपुर दरम्यानचे अंतर कमी होऊन केवळ  12 किलोमीटर राहील.

या नवीन पुलाच्या बांधकामादरम्यान सुमारे 2.19 लाख दिवसांची  प्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती होईल.

या नवीन पुलाच्या बांधकामामुळे बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्ग 106 वर उदाकिशनगंज आणि बिहपुर दरम्यानचे सध्याचे 30 किलोमीटर अंतर कमी होईल, जे नेपाळ / उत्‍तर बिहार/पूर्व-पश्चिम कॉरिडॉर (एनएच-57 वरून जाऊन ) आणि  दक्षिण बिहार/झारखंड/सुवर्ण चतुभुर्ज (एनएच-2 वरून )दरम्यान संपर्क वाढवेल. याशिवाय  राष्‍ट्रीय राजमार्ग क्रमांक-31 चा पूर्ण वापर सुनिश्चित होईल.

सध्या हा राष्ट्रीय महामार्ग एकपदरी असून वाईट स्थितीत आहे. त्यामुळे या महामार्गावर सरासरी वेग ताशी 20 किलोमीटर पेक्षा कमी आहे. मात्र बीरपुर-बिहपुर मार्गावर 106 किलोमीटर ते  136 किलोमीटर पर्यंत  पेव्‍ड शोल्‍डरसह दोन पदरी मार्गाचे उन्‍नयन आणि पुलाचे काम झाल्यानंतर वाहनांचा वेग ताशी सुमारे 100 किलोमीटर होईल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1542387) आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English