रेल्वे मंत्रालय
रेल्वेमधील स्वच्छता यंत्रणा
Posted On:
09 AUG 2018 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2018
भारतीय रेल्वेने प्रमुख स्थानकांवरील स्टेशन परिसरात स्वच्छता मानके अवलंबिण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांपैकी एक म्हणजे यांत्रिक पद्धतीने स्वच्छता प्रणालीचा वापर, सर्व प्लॅटफॉर्म, परिचालित क्षेत्र, फूट ओलांडणी, प्रतीक्षा गृहे, आरामालय इत्यादी ठिकाणी करणे. विशेषतः जिथे कोटा दगड, टाईल्स लावण्यात आली आहेत अशा ठिकाणी.
स्टेशनवरील स्वच्छता मोहिम यांत्रिक पदार्थांच्या सहाय्याने उच्च दाब वॉटर जेट्स, मशीनीकृत स्क्रबर, फ्लिपर्स, बॅटरी द्वारे पुश अँड राइड ऑन स्क्रबर, हाय प्रेशर जेट, व्हॅली व ड्राई व्हॉल्युम क्लिनर इत्यादीद्वारे आवश्यक मनुष्यबळ वापरून केली जाते. रेल्वे स्टेशन आणि त्या आवारात स्वच्छतेचा उच्च दर्जा राखण्यासाठी व्यावसायिक एजन्सीजकडे ही कार्यवाही बहिर्गत स्रोताद्वारे दिली जात आहे.
प्रभावी कचरा विल्हेवाट यंत्रणा राबविण्यासाठी, महत्वाच्या स्थानकांवर धुण्यायोग्य अँप्रॉन्स स्वच्छतेसाठी पुरविण्यात येणार आहे जिथे लांब पल्ल्यांच्या गाड्या सकाळच्या वेळी थांबतात , त्यांचा रात्रीचा रेल्वे प्रवास सुरू करण्यापूर्वी स्वछता झाल्यानंतर ह्या गाड्या स्टेशनमधून बाहेर पडतात.
लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल रेल्वे मंत्री राजेंद्र गोहेन यांनी हि माहिती दिली.
B.Gokhale/P.Malandkar
(Release ID: 1542260)
Visitor Counter : 70