आदिवासी विकास मंत्रालय

ट्रायफेड (आदिवासी कल्याण मंत्रालय) आणि राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ ( आयुष मंत्रालय) यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 09 AUG 2018 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2018

 

आदिवासी कल्याण मंत्रालयांतर्गत येणारा ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेड आणि आयुष मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ यांनी आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

आदिवासी वर्षानुवर्षे औषधी वनस्पतींची शेती करत असेल तरी आपल्या उत्पादनाच्या प्रत्यक्ष मूल्याविषयी ते अनभिज्ञ आहेत. या करारामुळे त्यांच्या उत्पादनाला खरी किंमत मिळण्यासाठी, तसेच त्यांना त्यांची स्वत:ची  क्षमता उमजण्यासाठी मदत होईल, असे आदिवासी विकास मंत्री जुआल ओराम यांनी सांगितले.

यामुळे रोजगारनिर्मिती आणि आदिवासी कौशल्य विकासाला चालना मिळेल असे आयुष खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 



(Release ID: 1542201) Visitor Counter : 141


Read this release in: English