रेल्वे मंत्रालय

रेल्वेच्या प्रतिक्षा यादीतील तिकीटांच्या निश्चितीकरणाची शक्यता वर्तवणारी यंत्रणा

Posted On: 03 AUG 2018 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2018

 

रेल्वेच्या प्रतिक्षा यादीतील तिकीटांच्या निश्चितीकरणाची शक्यता वर्तवणारी यंत्रणा विकसित करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षातील प्रतिक्षा याद्यांमधील प्रवाशांच्या तपशीलांच्या आधारे ही यंत्रणा विकसित केली आहे. 13 जून 2018 पासून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही यंत्रणा उपलब्ध आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून सर्वसामान्य वर्गातून प्रवास करु इच्छिणाऱ्या आणि प्रतिक्षा यादीत समाविष्ट असणाऱ्या प्रवाशांच्या या तिकीटांच्या निश्चितीकरणाची शक्यता वर्तवता येते.

सुट्यांच्या काळात रेल्वे प्रवासासाठी होणारी गर्दी लक्षात घेत प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना तिकीटांच्या निश्चितीकरणाची शक्यता, ही यंत्रणा वर्तवते.  मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रतिक्षा यादीतील तिकीटांच्या निश्चितीकरणाच्या शक्यतांची माहिती प्रवाशांना देण्याच्या दृष्टीने ही सुविधा उपयुक्त आहे.

रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

   

 

 

M.Chopade/M.Pange/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1541578)
Read this release in: English