वस्त्रोद्योग मंत्रालय

वस्त्रोद्योग निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पॅकेज

Posted On: 02 AUG 2018 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2018

 

आसियान क्षेत्रातील वस्त्रोद्योग उत्पादकांना भारतात गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. भारतात कच्या मालाची, कुशल मनुष्यबळाची आणि वस्त्रोद्योग उद्योगासाठी आवश्यक बाबींची सुलभ उपलब्धता लक्षात घेत त्या दृष्टीने भारत या उत्पादकांना आकर्षित करु शकतो. भारतात वस्त्रोद्योग क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीलाही परवानगी देण्यात आली आहे. या क्षेत्रातील निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारने वस्त्र प्रावरणे क्षेत्रासाठी एका विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये श्रमविषयक कायद्यांमध्ये सुधारणा, आयकरात सूट तसेच तंत्रज्ञान अद्यतनासंबंधीच्या योजनांचा समावेश आहे.

त्याचबरोबर हातमाग आणि हस्तकला वस्तूंच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे बाजारपेठांचा अभ्यास, मेळावे आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग तसेच विपणनासाठीही सहाय्य दिले जाते. कारागिर आणि गालिच्यांचे विणकाम करणाऱ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात तसेच नव्या रचनांसाठी उत्पादकांना सहाय्य केले जाते.  

वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तामटा यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar

 

 



(Release ID: 1541315) Visitor Counter : 73


Read this release in: English