वस्त्रोद्योग मंत्रालय

साथी उपक्रमाचा शुभारंभ

Posted On: 02 AUG 2018 4:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2018

 

यंत्रमाग क्षेत्रात ऊर्जा सक्षम वस्त्रोद्योग तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि अशा तंत्रज्ञानाचा वापर करतांना बचत करणे या उद्देशाने वस्त्रोद्योग मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालयाने संयुक्तपणे हाती घेतलेल्या साथी या उपक्रमाचा आज शुभारंभ झाला. एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पूर्वीच्या इलेक्ट्रिक मोटर बदलून त्या जागी ऊर्जा सक्षम अशा आयईथ्री या मोटर बसविणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात 10 ते 15 टक्के बचत अपेक्षित आहे.

या सक्षम उपकरणांमुळे विजेबरोबरच खर्चाचीही बचत होणार आहे. इचलकरंची, भिवंडी, ईरोड, सूरत, भिलवारा आणि पानीपत येथील यंत्रमाग समूहांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे.

वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तामटा यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar


(Release ID: 1541314)
Read this release in: English