वस्त्रोद्योग मंत्रालय
हातमाग क्षेत्र विकासांतर्गत, विणकरांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी
Posted On:
02 AUG 2018 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2018
देशातील हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी तसेच विणकरांच्या कल्याणासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे विविध योजना राबवल्या जातात. देशातील आठ मोठ्या हातमाग समुहांसाठी हातमाग विणकर एकात्मिक कल्याण योजना, राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम, सूत पुरवठा योजना आणि एकात्मिक हातमाग समूह विकास योजना राबविल्या जात आहेत.
या योजनांतर्गत, कच्च्या मालाच्या खरेदीसाठी, माग आणि इतर उपकरणे खरेदी करण्यासाठी वित्त सहाय्य तसेच रचनेतील नाविन्यता, उत्पादनांतील विविधता, पायाभूत सुविधांचा विकास, कौशल्य विकास, हातमाग उत्पादनांचे विपणन आणि सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. विणकरांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठीही वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे, एकात्मिक कल्याणकारी योजना राबवली जात आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजनेअंतर्गत, 18 ते 50 वयोगटातील विणकर आणि कामगारांना जीवन विम्याचे कवच दिले जाते तर प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेअंतर्गत, याच वयोगटातील विणकर आणि कामगारांना अपघात विम्याचेही संरक्षण दिले जाते.
विणकरांबरोबरच विणकरांच्या विधवा पत्नीसाठीही या योजनांचे लाभ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर हातमाग विणकरांच्या दोन मुलांना प्रत्येकी बारा वर्षे इतकी वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.
मुद्रा योजनेअंतर्गत हातमाग विणकरांना सहा टक्के इतक्या सवलतीच्या व्याजदराने पतपुरवठा उपलब्ध करुन दिला जातो. गेल्या तीन वर्षात 324 विणकरांना अशा प्रकारे 1.61 कोटी रुपयांची रक्कम मुद्रा योजनेअंतर्गत मंजुर करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तामटा यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/M.Pange/P.Malandkar
(Release ID: 1541313)