श्रम आणि रोजगार मंत्रालय
मुद्रा योजनेच्या माध्यमातून 3.49 कोटी नवउद्योजकांना लाभ
Posted On:
01 AUG 2018 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2018
देशात रोजगार वाढीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम राबवित आहे. अर्थव्यवस्थेत खासगी क्षेत्रांना प्रोत्साहन देणे तसेच प्रधानमंत्री रोजगार हमी योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना आणि दीनदयाल अंत्योदय योजना अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार आणि नवउद्योजक निर्मितीला चालना देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म आणि लघु उद्योजक तसेच स्वतंत्र व्यक्तींना बिगर कृषक क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. या योजनेअंतर्गत 2015-16 ते 2017-18 या अवधित 12.27 कोटी खातेधारकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. यात 3.49 कोटी नव उद्योजकांचा समावेश आहे. दादरा आणि नगरहवेलीसह महाराष्ट्रात 2015-16 या आर्थिक वर्षात 20,161 जणांनी या योजनेचा लाभ घेतला. 2017-18 पर्यंत ही संख्या 26,632 पर्यंत वाढली. 2018-19 अर्थात चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील 8744 जणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष कुमार गंगवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/M.Pange/P.Malandkar
(Release ID: 1541050)