अर्थ मंत्रालय
आयकर विवरणपत्रे भरायला मुदतवाढ
Posted On:
26 JUL 2018 6:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जुलै 2018
काही विशिष्ट प्रवर्गातील करदात्यांसाठी 2018-19 या वर्षासाठीची आयकर विवरणपत्रे भरायची मुदत 31 जुलै 2018 पर्यंत होती. ही विवरणपत्रे भरायला मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतला आहे. त्यानुसार संबंधित प्रवर्गातील करदात्यांना 31 ऑगस्ट 2018 पर्यंत आयकर विवरणपत्रे भरता येतील.
B.Gokhale/M.Pange/P.Kor
(Release ID: 1540438)