वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या विकासाची प्रगती

Posted On: 25 JUL 2018 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25  जुलै  2018

 

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर क्षेत्र विकसित करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून गुंतवणुकीसाठी 24 औद्योगिक क्षेत्रे आणि ठिकाणे निर्धारित करण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात एकूण 8 विभागांमधील क्षेत्रे विकसित केली जाणार आहेत.

महाराष्ट्रात दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रात  253 चौरस किलोमीटर क्षेत्र विकसित केले जाणार असून शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील 84 किलोमीटर क्षेत्र विकसित केले जाणार आहे. अत्युच्च प्रदूषण प्रवर्गात येणारे उद्योग वगळता इतर औद्योगिक एककांना या क्षेत्रात आपआपले उत्पादन प्रकल्प सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, कृषी आणि अन्न प्रक्रिया अशा उद्योगांचा समावेश आहे.

महाराष्ट्राती शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील 100 एकर जागेवर स्पॅन्डेक्सचे उत्पादन एकक उभारण्यासाठी परकीय कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

 

N.Sapre/M.Pange/P.Malandkar


(Release ID: 1540117)
Read this release in: English