आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसणारे जिल्हे

Posted On: 24 JUL 2018 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  जुलै  2018

 

राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत केंद्र सरकारने देशातील 256 जिल्हे हे उच्च प्राधान्य जिल्हे म्हणून निश्चित केले आहेत. देशातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यांमध्ये पुरेशा आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या जिल्ह्यांमधील आवश्यक त्या सुविधा प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गतविशेष प्रयत्न केले जात आहेत.

यात उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक 25 जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातीलही नांदेड, हिंगोली,जळगांव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, यवतमाळ, नाशिक, ठाणे, अहमदनगर आणि गडचिरोली या  12 जिल्ह्यांचा यात समावेश आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्वीनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत याबाबत माहिती दिली.

 

N.Sapre/M.Pange/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1539932) Visitor Counter : 108
Read this release in: English