नौवहन मंत्रालय

जलमार्ग वाहतूक विकास

Posted On: 23 JUL 2018 6:32PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 जुलै 2018

 

महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टसह (जेएनपीटी) देशातील पाच पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून राष्ट्रीय जलमार्ग विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. नौवहन आणि रस्ते वाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत याबाबत माहिती दिली.

यात महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अंतर्गत अंबा नदीत 45 किमी, अरुणावती-आरन नदीत 99 किमी, दाभोळ खाडी-वसिष्ठी नदीत 45 किमी, कल्याण-ठाणे-मुंबई जलमार्ग, वसई खाडी-उल्हास नदीत 145 किमी, मांजरा नदीत 245 किमी, नाग नदीत 59 किमी, पेणगंगा-वर्धा नदीत 262 किमी, रेवदंडा खाडी-कुंडलिका नदीत 31 किमी, बाणकोट खाडी-सावित्री नदीत 46 किमी, तापी नदीत 436 किमी तर वैनगंगा प्राणहिता नदीच्या क्षेत्रात 166 किमी अंतराचे जलमार्ग विकसित केले जाणार आहेत.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor



(Release ID: 1539739) Visitor Counter : 81


Read this release in: English