रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे धोरणात्मक निर्णय

Posted On: 23 JUL 2018 6:26PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 जुलै 2018

 

देशातील रस्ते आणि महामार्गाची स्थिती सुधारण्याबरोबरच ते अद्ययावत करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने जून 2014 नंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत त्याबाबत माहिती दिली.

रस्ते रुंदीकरणाचे प्रकल्प राबविण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अधिक जलद करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण प्रक्रिया डिजिटाईझ करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी भूमीराशी हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले. रस्ते विकासाशी संबंधित प्रकल्पांच्या देखरेखीसाठी प्रकल्प देखरेख माहिती यंत्रणा विकसित करण्यात आली. आजघडीला या यंत्रणेच्या माध्यमातून 2000 पेक्षा जास्त प्रकल्पांवर देखरेख ठेवली जात आहे.

देशांतर्गत तसेच बांगलादेश, भूतान, नेपाळ या देशांशी रस्ते मार्गावरुन वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठीही विविध प्रकल्प राबविले जात आहेत. 36 राज्यांमधील प्रादेशिक परिवहन कार्यालये आंतरजालाच्या सहाय्याने परस्परांशी जोडण्यात आली आहेत. वाहनांची नोंदणी आणि वाहनचालक परवाने आता ऑनलाईन जारी केले जात आहेत. तसेच सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा स्तरावर रस्ते सुरक्षा समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.

 

N.Sapre/M.Pange/P.Kor

 



(Release ID: 1539737) Visitor Counter : 73


Read this release in: English