नौवहन मंत्रालय

सागरमाला प्रकल्पाची अंमलबजावणी

Posted On: 23 JUL 2018 5:45PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 जुलै 2018

 

भारतातील बंदरे परस्परांशी जोडण्याच्या उद्देशाने राबविल्या जात असलेल्या सागरमाला कार्यक्रमांतर्गत सुमारे अडीच लाख कोटी रुपये खर्चाचे सुमारे दोनशे प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. यात 112 रस्ते प्रकल्प, 70 रेल्वे प्रकल्प, 11 अंतर्गत जलमार्ग प्रकल्प, 3 पाईपलाईन प्रकल्प आणि 15 बहुपर्यायी लॉजिस्टीक पार्कसचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारतीय रेल्वे, रस्ते आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण अशा विविध संस्था हे प्रकल्प राबवित आहेत.

महाराष्ट्रात जालना, वर्धा, सांगली आणि नाशिक येथे जेएनपीटीमार्फत 4 बहु पर्यायी लॉजिस्टीक्स पार्कस विकसित केली जात आहेत. तसेच पुणे, सातारा, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी ही ठिकाणे रस्ते किंवा रेल्वेमार्गाने बंदरांशी जोडली जात आहेत.

नौवहन आणि रस्ते वाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

N.Sapre/M.Pange/P.Kor



(Release ID: 1539707) Visitor Counter : 150


Read this release in: English