अर्थ मंत्रालय

वस्तू आणि सेवा कर विवरणपत्र सुलभ करण्याला वस्तू आणि सेवा कर परिषदेची मान्यता

Posted On: 21 JUL 2018 8:30PM by PIB Mumbai

केंद्रीय रेल्वे, वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवाकर परिषदेच्या  नवी दिल्लीत झालेल्या 28 व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराच्या नव्या विवरणपत्र प्रारूपाला आणि त्याच्याशी सबंधित कायद्यातल्या बदलाला मान्यता देण्यात आली.

छोट्या करदात्यांना, कराचा भरणा दर महिन्यात करून सुलभ प्रारुपातले  कर विवरणपत्र तिमाही भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही सर्वात मोठी सुधारणा करण्यात आली आहे.

छोटे करदाते आणि आय एस डी सारखे काही अपवाद वगळता सर्व करदात्यांना मासिक विवरणपत्र भरावे लागेल. केवळ दोन तक्ते असलेले हे विवरणपत्र असेल.या पद्धतीत बराचसा भाग हा विक्रेता आणि ग्राहक यांनी भरलेल्या इनव्हाइसवर आधारित आपोआप भरला जाईल. अप लोड-लॉक-पे या स्वरुपात ही प्रक्रिया राहणार आहे. नील विवरण पत्र अर्थात खरेदी आणि विक्री नसणाऱ्या व्यक्तीं, एस एम एस पाठवून हे विवरण पत्र भरु शकणार आहेत.

 

5 कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या छोट्या करदात्यांना तिमाही विवरणपत्र भरण्याची वैकल्पिक सुविधा देण्याला वस्तू आणि सेवा कर परिषदेने मान्यता दिली.

विवरणपत्रात सुधारणा करायची असल्यास सुधारणा विवरणपत्र भरून त्या द्वारे सुधारणा करता येईल.

93 % पेक्षा जास्त करदात्यांची उलढाल 5 कोटी पेक्षा कमी असल्याने, प्रक्रिया सुलभ करण्याच्या निर्णयाचा त्यांना मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे व्यापार करण्यासाठी सुलभता वाढणार आहे. मोठ्या कर दात्यानाही नव्या प्रारुपातले विवरणपत्र सुकर आणि सुलभ राहणार आहे.  


***


NS/NC



(Release ID: 1539587) Visitor Counter : 70


Read this release in: English , Bengali