रेल्वे मंत्रालय

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेगाड्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा

Posted On: 20 JUL 2018 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20  जुलै  2018

 

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर एमर्जन्सी टॉक बॅक यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सध्या दोन रेल्वेगाड्यांमधील महिलांच्या सहा डब्यांमध्ये ही यंत्रणा उपलब्ध असून त्यामार्फत आपत्कालीन स्थितीत रेल्वे प्रवाशांना संवाद साधता येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांतर्गत उपनगरी मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

 रेल्वे मंत्रालयाने 2018 हे वर्ष महिलांच्या सुरक्षेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. त्या अंतर्गत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये महिलांच्या डब्यात तसेच फलाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, 182 हा हेल्पलाईन क्रमांक ॲपशी जोडणे तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक संवेदनशील करण्यासाठी प्रशिक्षण आणि नियमित उद्‌घोषणा असे विविध उपक्रम राबवले जात आहेत.

रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 

 

 

 

N.Sapre/M.Pange/P.Malandkar

 



(Release ID: 1539510) Visitor Counter : 72


Read this release in: English