इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची व्हॉट्सॲपला सूचना

Posted On: 20 JUL 2018 2:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20  जुलै  2018

 

व्हॉट्सॲप या समाजमाध्यमावरुन प्रक्षोभक संदेश प्रसारित झाल्यामुळे घडणाऱ्या दुर्देवी घटनांच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपला या संदर्भात अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. या संदर्भात मंत्रालयात पाठवलेल्या पत्राच्या उत्तरादाखल व्हॉट्सॲपने, आपण करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आहे.

बिदर येथे मुलांच्या अपहरणासंदर्भातील संदेश प्रसारित झाल्यानंतर निव्वळ अफवेमुळे एका 32 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला जीव गमवावा लागला, यावरुन अशा संदेशामुळे होणाऱ्या हानीची कल्पना येते. व्हॉट्सॲप या समाजमाध्यमावरुन कोणतीही खातरजमा न करता अशा प्रकारचे संदेश सर्रास प्रसारित केले जातात. ते वेळीच रोखण्याची आवश्यकता मंत्रालयाने व्यक्त केली आहे. दिशाभूल करणाऱ्या बातम्या ओळखणे आणि आपल्याकडे आलेल्या बातम्या फॉरवर्ड करतांना तशा लेबलची सोय करणे या दृष्टीने व्हॉट्सॲप प्रयत्नशील आहे. मात्र या समाजमाध्यमावरुन प्रसारित होणाऱ्या संदेशांच्या माध्यमातून पसरलेल्या अफवा जीवघेण्या ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात असे मंत्रालयाने सांगितले आहे.

N.Sapre/M.Pange/P.Malandkar



(Release ID: 1539427) Visitor Counter : 114


Read this release in: English