अणुऊर्जा विभाग
देशात 10 स्वदेशी अणुऊर्जा रिॲक्टर बनवले जाणार
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2018 6:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2018
देशात 10 स्वदेशी अणुऊर्जा रिॲक्टर बसवण्यासाठी सरकारने शासकीय आणि वित्तीय मंजुरी जून 2017 मध्ये दिली आहे. या रिॲक्टरची प्रत्येकी क्षमता 700 मेगावॅट आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवण्यात येणारे हे रिॲक्टरर्स भारतीय अणुऊर्जा निगम लिमिटेड यांच्या मार्फत बसवले जातील.
मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा या राज्यांमध्ये प्रत्येकी 700 मेगावॅटचे दोन तर राजस्थानमध्ये प्रत्येकी 700 मेगावॅटचे 4 रिॲक्टर असणार आहेत.
या योजनेच्या पूर्वतयारी अंतर्गत भूमी अधिग्रहण, पुनर्वसन आणि पर्यावरण संदर्भातील मंजुरी आदी प्रकिया विविध स्तरावर सुरु आहेत. पंतप्रधान कार्यालय, ईशान्येकडील क्षेत्रांचा विकास, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन तसेच अणु ऊर्जा आणि अंतराळ विभागचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Tupe /P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1539340)
आगंतुक पटल : 132
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English