मंत्रिमंडळ

भारतीय सनदी लेखापरीक्षण संस्‍था व इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकौंटटंस, आयर्लंड दरम्यानच्या 2010 मधील तसेच नवीन परस्पर मान्यता कराराला (एमआरए) मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 18 JUL 2018 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  जुलै  2018

 

भारतीय सनदी लेखापरीक्षण संस्‍था व इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकौंटटंस, आयर्लंड दरम्यान वर्ष 2010 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या तसेच नवीन परस्पर मान्यता कराराला (एमआरए) मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा करार, भारत व आयर्लंड मधील लेखापरीक्षणातील ज्ञान, व्यावसायिकता व बौद्धिक विकास यांमधील परस्पर सहकार्याला पूरक व्हावा, संबंधित सदस्यांना त्यांची आवड जोपासता यावी, तसेच दोन्ही देशातील या व्यवसायाच्या सकारात्मकतेत वाढ व्हावी यासाठी करण्यात आला आहे.  

प्रभाव:

हा करार दोन्ही पक्षांच्या सदस्यांना देशामध्ये उत्तम कामाच्या संधी उपलब्ध करून देईल व नवीन बाजारपेठांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आपल्या व्यापाराचे कार्यक्षेत्र वाढविण्यास मदत करेल. 

पार्श्वभूमी:

भारतीय सनदी लेखापरीक्षण संस्‍था (आयसीएआय) ही भारतामध्ये चार्टर्ड अकौंटंट व्यवसाय नियंत्रित करण्यासाठी भारतीय संसद अधिनियम द चार्टर्ड अकाउंटंट अॅक्ट, 1949 अंतर्गत  स्थापन झालेली एक संवैधानिक संस्था आहे. तर इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकौंटटंस ही आयर्लंड मधील मुख्य आयरिश लेखापरीक्षण विषयक संस्थांपैकी एक आहे; ज्यामध्ये 5000 अधिक सदस्य व विद्यार्थी आहेत.

B.Gokhale/S.Pophale/P.Malandkar


(Release ID: 1539244) Visitor Counter : 116
Read this release in: English