मंत्रिमंडळ
भारत व इंडोनेशिया मधील औषधी उत्पादने, औषधी पदार्थ, जैविक उत्पादने व सौंदर्यप्रसाधने नियामक कार्यक्षेत्रात सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
18 JUL 2018 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2018
भारत व इंडोनेशिया मध्ये करण्यात आलेल्या औषधी उत्पादने, औषधी पदार्थ, जैविक उत्पादने व सौंदर्यप्रसाधने नियामक कार्यक्षेत्रात सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था, भारत व नॅशनल एजन्सी फॉर ड्रग्ज ऍण्ड फूड कंट्रोल (बीपीओएम), इंडोनेशिया दरम्यान 29 मे 2018 ला जकार्ता येथे या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
हा करार परस्परांच्या नियामक गरजा चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी लाभदायक ठरेल. भारतीय औषधी उत्पादने निर्यात करण्यामध्येही हा करार सहाय्यक ठरेल.
पार्श्वभूमी :
सीडीएससीओ आरोग्य सेवा संचलनालयाच्या अधीनस्थ असलेला एक विभाग आहे, जे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाशी संलग्न आहे. तसेच भारतातील औषधे, वैद्यकीय उपकरणे व सौंदर्य प्रसाधनांसाठी राष्ट्रीय नियामक प्राधिकरण म्हणून हा विभाग काम पाहतो. बीपीएमओ इंडोनेशियामध्ये ही उत्पादने नियंत्रित करते. सीडीएससीओ, भारत व बीपीएमओ, इंडोनेशिया यांमधील हा सामंजस्य कराराला भारत सरकारच्या नियम 12 (व्यापार व्यवहार) 1961 नुसार पंतप्रधानांची मंजुरी मिळाली आहे.
B.Gokhale/S.Pophale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1539242)
आगंतुक पटल : 110
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English