मंत्रिमंडळ

पारंपारिक औषधी व होमिओपॅथी क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत व क्युबा दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 18 JUL 2018 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  जुलै  2018

 

पारंपारिक औषधी होमिओपॅथी क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत क्युबा दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या करारावर 22 जून 2018 रोजी स्वाक्षरी झाली होती.

प्रभाव :

या करारामुळे दोन्ही देशांमधील पारंपारिक औषधी होमिओपॅथी क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत होईल. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक वारसा बघता या कराराला असामान्य महत्व असेल.

पार्श्वभूमी :

भारतातील आयुर्वेद, योग निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोव रीग्पा (तिबेटीयन उपचार पद्धती) होमिओपॅथी या पारंपारिक उपचार पद्धती उत्तमरीत्या सांभाळण्यात आलेल्या आहेत. जागतिक आरोग्य स्थिती लक्षात घेता या प्रणालींमध्ये प्रचंड क्षमता आहे. आयुष मंत्रालयाने या पारंपारिक उपचार पद्धतींचा जागतिक पातळीवर प्रचार, प्रसार करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून पारंपारिक औषधी क्षेत्रात आयुष मंत्रालयाने आतापर्यंत 10 देशांसह सामंजस्य करार केले असून हे करार दोन देशांचे नियमन पैलू चांगल्याप्रकारे समजावून घेण्यास इंडोनेशियामध्ये भारतीय औषधी उत्पादनांची निर्यात वाढविण्यात तसेच आंतरराष्ट्रीय मंचावर उत्तम सहकार्यासाठी मदत करतील.

 

B.Gokhale/S.Pophale/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1539241) Visitor Counter : 111


Read this release in: English