मंत्रिमंडळ

ब्रिक्स राष्ट्रांदरम्यान झालेल्या प्रादेशिक विमानचालन भागीदारी सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 18 JUL 2018 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  जुलै  2018

 

ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स राष्ट्रांदरम्यान झालेल्या प्रादेशिक विमानचालन भागीदारी सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ठळक वैशिष्ट्ये :

नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील सहकार्यासाठी संस्थात्मक आराखड्यामुळे ब्रिक्स देशांना फायदा व्हावा हा उद्देश आहे. यासाठी खालील क्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत.

  • सार्वजनिक धोरणे व प्रादेशिक स्तरावर उत्तम सेवा;
  • प्रादेशिक विमानतळे
  • विमानतळावरील पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन व हवाई वाहतूक सेवा;
  • नियामक संस्थांमधील तांत्रिक सहकार्य;
  • नाविन्यपूर्ण कल्पना/उपक्रम;
  • पर्यावरण निरंतरता; जागतिक पातळीवर घेण्यात आलेल्या पुढाकारांच्या विवेचनासह;  
  • पात्रता व प्रशिक्षण;
  • परस्परांच्या आवश्यकतेनुसार इतर क्षेत्रे

प्रभाव :

हा सामंजस्य करार भारत व इतर देशांच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील संबंधांचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे; ज्यामुळे ब्रिक्स देशांमध्ये अधिक चांगला व्यापार, गुंतवणूक, पर्यटन व सांस्कृतिक देवाणघेवाण होईल.

 

B.Gokhale/S.Pophale/P.Malandkar

 



(Release ID: 1539223) Visitor Counter : 76


Read this release in: English