मंत्रिमंडळ

इंस्टिट्युट ऑफ चार्टड अकाऊंटस ऑफ इंडिया आणि टांझानिया मधल्या नॅशनल बोर्ड ऑफ अकाऊंटस एन्ड ऑडीटर्स यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 18 JUL 2018 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  जुलै  2018

 

आय सी ए आय म्हणजेच इंस्टिट्युट ऑफ चार्टड अकाऊंटस ऑफ इंडिया आणि टांझानिया मधल्या एनबीएए म्हणजेच नॅशनल बोर्ड ऑफ अकाऊंटस एन्ड ऑडीटर्स  यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत सदस्य व्यवस्थापन,व्यावसायिक नीतिमूल्ये, तंत्र संशोधन, लेखा परीक्षण, गुणवत्ता देखरेख,व्यावसायिक आणि बौद्धिक विकास या क्षेत्रात परस्पर सहकार्य ढाचा तयार करण्यात येणार आहे.

परिणाम

या सामंजस्य करारामुळे आय सी ए आय सदस्यांना,विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या संघटनाच्या हिताच्या दृष्टीने परस्पर हित संबंध विकसित होतील. या सामंजस्य करारामुळे  आय सी ए आय सदस्यांना व्यावसायिक कक्षा रुंदावण्यासाठी संधी मिळणार आहे. या सामंजस्य करारामुळे  आय सी ए आय आणि टांझानिया मधल्या एनबीएए यांच्यातले संबंध दृढ करण्याला चालना मिळेल.

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 



(Release ID: 1539210) Visitor Counter : 78


Read this release in: English