मंत्रिमंडळ

इंस्टिट्युट ऑफ चार्टड अकाऊंटस ऑफ इंडिया आणि बहारीनच्या इंस्टिट्युट ऑफ बँकिंग एन्ड फायनान्स यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 18 JUL 2018 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  जुलै  2018

 

बहारीन मधे लेखा, वित्तीय आणि लेखापरीक्षण विषयक ज्ञानाचा पाया दृढ करण्यासाठी बहारीनमधल्या इंस्टिट्युट ऑफ बँकिंग एन्ड फायनान्स आणि भारतातल्या इंस्टिट्युट ऑफ चार्टड अकाऊंटस ऑफ इंडिया यांच्यात  एकत्र काम करण्याविषयी झालेल्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  

वैशिष्ट्ये

बीआयबीएफ अर्थात बहारीनच्या इंस्टिट्युट ऑफ बँकिंग एन्ड फायनान्सचा लेखा आणि वित्त विषयक सध्याच्या  अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन,  इंस्टिट्युट ऑफ चार्टडअकाऊंटस ऑफ इंडिया म्हणजेच आय सी ए आय, बीआयबीएफला तंत्र विषयक सहाय्य पुरवेल.

आय सी ए आय आपला सी ए अभ्यासक्रम लागू करण्याची शिफारस करेल,ज्यामुळे  बीआयबीएफ विद्यार्थ्यांना आय सी ए आयचे सदस्यत्व प्राप्त करण्याच्या उद्देशाने बीआयबीएफ विद्यार्थ्यांना,आय सी ए आय परीक्षा देण्यासाठी मदत होईल.

पात्र,बीआयबीएफ विद्यार्थ्यांसाठी आय सी ए आय व्यावसायिक परीक्षा घेण्यासाठी, आय सी ए आय,तांत्रिक सहाय्य पुरवेल.

या सामंजस्य करारामुळे  आय सी ए आय सदस्यांना व्यावसायिक कक्षा रुंदावण्यासाठी संधी मिळणार आहे.

लाभार्थी

बहारीन मधे स्थानिक व्यावसायिक लेखा संस्था नाही म्हणून बीआयबीएफने, आयसीएआयशी सहयोग केला आहे.यामुळे बहारीन मधे काम करणाऱ्या सनदी लेखापालांवर सकारात्मक परिणाम होणार आहे त्याचबरोबर बहारीनला जाऊ इच्छिणाऱ्यासाठीही तुलनेत सुलभता येणार आहे.

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar



(Release ID: 1539209) Visitor Counter : 90


Read this release in: English