आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
देवरिया येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या उत्तर प्रदेश सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
18 JUL 2018 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत 250 कोटी रुपये खर्चाच्या देवरिया जिल्हयातील सालेमपूर येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या उत्तर प्रदेश सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
केंद्र पुरस्कृत योजनांच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयांशी संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापनेसाठी तीन संसदीय क्षेत्रात एक वैद्यकीय आणि प्रत्येक राज्यात एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापण्याचा निकष ठरविण्यात आला आहे. यानुसार 24 अतिरिक्त वैद्यकीय महाविद्यालये ज्यात उत्तर प्रदेशातील 8 वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे.
N.Sapre/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1539079)
आगंतुक पटल : 84
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English