संरक्षण मंत्रालय

संरक्षण सहकार्याबाबत भारत-अमेरिका प्रतिनिधी मंडळाची बैठक

Posted On: 18 JUL 2018 5:26PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 जुलै 2018

 

भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांचा भाग म्हणून भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळादरम्यान 7वी संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण उत्पादन सचिव डॉ. अजय कुमार आणि अमेरिकेच्या संरक्षण उपसचिव एलेन लॉर्ड यांच्या सहअध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

भारत सहकार भारतीय संरक्षण उद्योग आणि ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला गती देण्यासाठी अनेक पावले उचलत आहेतअसे अजय कुमार म्हणाले. संरक्षण विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत या क्षेत्रासाठी मोठी तरतूद करत आहे असे ते म्हणाले.

भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य उभय देशांमधील संरक्षण संबंधांचा महत्त्वाचा स्तंभ आहे. भारत हा अमेरिकेचा प्रमुख संरक्षण भागीदार असल्याचे एलेन लॉर्ड म्हणाल्या.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor


(Release ID: 1539045) अभ्यागत कक्ष : 128
Read this releasein: English