रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ट्रक ॲक्सल लोडमध्ये वाढ अधिसूचित केली
Posted On:
18 JUL 2018 4:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2018
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ट्रक ॲक्सल लोडमधील वाढीला परवानगी देणारी अधिसूचना जारी केली आहे. सुधारित नियमांनुसार, वाहनांच्या प्रत्येक ॲक्सल प्रकारचे कमाल सुरक्षित ॲक्सल वजन पुढीलप्रमाणे असेल.
अ.
|
ॲक्सलचा प्रकार
|
कमाल सुरक्षित ॲक्सल
|
क्र.
|
|
वजन
|
1.
|
सिंगल ॲक्सल
|
|
1.1
|
सिंगल ॲक्सल सिंगल टायरसह
|
3 टन
|
|
|
|
1.2
|
सिंगल ॲक्सल दोन टायरसह
|
7.5 टन
|
|
|
|
1.3
|
सिंगल ॲक्सल चार टायरसह
|
11.5 टन*
|
|
|
|
2.
|
दोन ॲक्सलमधील अंतर 1.8 मीटरपेक्षा कमी असलेले टॅन्डेम ॲक्सल
|
|
|
|
|
2.1
|
दणकट वाहने, ट्रेलर्स आणि सेमी ट्रेलर्सचे टॅन्डेम ॲक्सल
|
21 टन*
|
|
|
|
2.2
|
हायड्रोलिक आणि न्युमॅटिक ट्रेलर्सच्या पुलर ट्रॅक्टर्सचे टॅन्डेम ॲक्सल
|
28.5 टन
|
|
|
|
3.
|
बाहेरील ॲक्सलदरम्यान अंतर 3 मी.पेक्षा कमी असलेले ट्राय - ॲक्सल्स
|
|
|
|
|
3.1
|
दणकट वाहने, ट्रेलर्स आणि सेमी ट्रेलर्सचे ट्राय-ॲक्सल
|
27 टन*
|
|
|
|
4.
|
मॉड्यूलर हायड्रोलिक ट्रेलर्समधील ॲक्सल रो
|
18 टन
|
|
(सिंगल ॲक्सलला 9 टन वजनाची परवानगी)
|
|
*जर वाहनात न्युमॅटिक सस्पेंशन असेल तर प्रत्येक ॲक्सलसाठी 1 टन अतिरिक्त भाराला परवानगी
वाहतुकीचा खर्च कमी करणे आणि मालवाहतूक वाहनांची मालवहन क्षमता वाढवण्यासाठी ॲक्सल लोड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितले. या सुधारणेमुळे मालवाहतूक क्षमता 20-25 टक्के वाढेल आणि वाहतुकीचा खर्च 2 टक्के ने कमी होईल असे ते म्हणाले.
गेल्या काही वर्षात ऑटोमोबाईल तंत्रज्ञान आणि रस्ते बांधणीचा दर्जा कमालीचा सुधारूनही ॲक्सल लोड 1983 पासून तेवढाच आहे, असे ते म्हणाले.
क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल असे म्हणाले.
N.Sapre/S.Kane/P.Kor
(Release ID: 1539001)