पंतप्रधान कार्यालय

नुतन भारत परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 16 JUL 2018 11:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 जुलै 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे Y4D नुतन भारत परिषदेला संबोधित केले.  यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आज देश परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार भारतातील दारिद्रय उल्लेखनीय कमी झाले असून भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील अत्यंत वेगवान अर्थव्यवस्था म्हणून ओळखण्यात येते. सरकारतर्फे जर कुठली भूमिका निभवायची असेल तर फक्त तरुणवर्गच अशा भूमिकांना पात्र असतो. कारण तो केवळ उपलब्ध संधींचाच उपयोग करत नाही तर नवीन संधी उपलब्ध करून देत असतो. पंतप्रधानांनी युवकांची शक्ती आणि आकांक्षांना विचारात घेऊन भारत मोठ्या प्रमाणात परिवर्तन प्रक्रियेतून जात असल्याचे पुर्नउच्चार केला. यासंदर्भात उदाहरण देतांना त्यांनी 3 कोटी मुलांचे लसीकरण, मागील चार वर्षांदरम्यान 1.75 लक्ष किलोमीटर ग्रामीण रस्त्यांची निर्मिती, प्रत्येक गावामध्ये वीज पोहोचवणे, ऑक्टोबर 2017 पासून आतापर्यंत 85 लाख घरांचे विद्युतीकरण, 4.65 कोटी गरीब कुटुंबांना गॅस जोडणी आणि मागील चार वर्षात 1 कोटींपेक्षा जास्त घरांची निर्मिती.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, हे सर्व आकडे यासाठी संभव आहेत कारण भारतात 800 दशलक्ष लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

पंतप्रधानांनी सांगितले की, वातावरणातील बदल हा केवळ राजनिती पुरताच मर्यादित नाही. ते म्हणाले सध्या भारतात सर्वोच्च प्रशासनिक सेवेत ग्रामीण भागातून किंवा छोट्या शहरांमधून आलेले युवक आहेत. त्यांनी हिमा दास आणि तत्सम सर्व तरुण खेळाडू ज्यांनी नुतन भारताचे प्रतिनिधीत्व केले आणि खेळाडूपणाच्या दृष्टीकोनातून भारतासाठी पदके मिळवले आहेत त्यांची उदाहरणे दिली.

नुतन भारताला असे वाटते की, ‘सर्व काही शक्य’ आणि ‘सर्व काही संपादन करण्यासारखे आहे’ असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, अनेक उपायांवर प्रोत्साहनासाठी सिलॉसचा पुनर्बदलासाठी उपयोग करण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले की, आता राष्ट्रांच्या गरजांकडे समजावणुकीच्या भावनेतून लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच लोकांचे राहणीमान साधे ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी सरकारतर्फे पुढाकार घेऊन विविध योजनांची अंमलबजावणी केल्याचे स्पष्ट केले. यामध्ये भारतमाला, सागरमाला, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया, आयुष्यमान भारत या योजना असून याद्वारे देशाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यात येते. त्यांनी भारत सरकार नुतनीकरण आणि संशोधनावर जोर देत असल्याचे सांगितले.

पंतप्रधनांनी डिजिटल पध्दतीतून पैशांचे व्यवहार तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे सांगितले. स्वातंत्र्याच्या लढ्यात युवकांनी ऊर्जा आणि धैर्य दाखवून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आता वर्तमानात तरुणांनी नुतन भारतासाठी अशी भूमिका सादर करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1538842) Visitor Counter : 120


Read this release in: English