पंतप्रधान कार्यालय

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 20 वर्षाखालील 400 मीटर धावस्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दास हिचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 13 JUL 2018 11:57AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13  जुलै  2018

 

फिनलँड येथे सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 20 वर्षाखालील 400 मीटर  धावस्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारी धावपटू हिमा दास  हिचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 20 वर्षाखालील 400 मीटर  धावस्पर्धेत सुवर्ण पदक  जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारी धावपटू हिमा दास हिचा भारताला अभिमान वाटतो. तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन! तिचे हे यश भावी काळात युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देईल, असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/ R.Aghor/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1538531) Visitor Counter : 125


Read this release in: English