उपराष्ट्रपती कार्यालय

पारदर्शकता आणि जबादारी आपले मार्गदर्शक तत्व बनावे : उपराष्ट्रपती

उज्ज्वल भावितव्यासाठी निसर्ग, संस्कृती आणि स्थापत्याचे जतन करा-उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 12 JUL 2018 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12  जुलै  2018

 

जनहितासाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी पारदर्शकता आणि जबाबदारीचे भान ही मार्गदर्शक तत्वे  असायला हवीत असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत आज झालेल्या 164 व्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फान्स कन्ननथानम आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

नगरविकास क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिशय महत्व आहे, कारण शहरांमध्ये पर्यावरणपूरक आणि इमारती बांधण्याचे काम या विभागाचेच आहे, असे नायडू म्हणाले. 

भारतात सध्या नागरी पुर्नर्निर्माणाची चळवळ सुरु झाली असून देशात होणाऱ्या सुधारणांमुळे सगळे जग प्रभावित झाले आहे असे राष्ट्रपती म्हणाले. आज भारत जगातली सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते, ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे असे ते पुढे म्हणाले.

पर्यावरण रक्षणासाठी इमारत बांधताना सौर ऊर्जेसारख्या नैसर्गिक स्रोतांचा वापर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या सुविधा देण्यावर भर असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एक अभियांत्रिकी संस्था म्हणून देशातल्या पायाभूत क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर आणि संशोधनावर भर द्यावा असे ते म्हणाले. एखादा प्रकल्प वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे असे सांगत बांधकाम पद्धतीत सुधारणा करण्यावर भर दिला जावा असे व्यंकय्या नायडू म्हणाले.

 

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1538459) Visitor Counter : 80


Read this release in: English