राष्ट्रपती कार्यालय

भारतीय संरक्षण संपत्ती सेवा विभागासह विविध विभागांच्या प्रशिक्षणार्थींची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी भेट

Posted On: 11 JUL 2018 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11  जुलै  2018

 

भारतीय संरक्षण संपत्ती सेवा, भारतीय दूरसंवाद सेवा आणि इतर सेवांच्या प्रशिक्षणार्थींनी आज राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या सेवांच्या माध्यमातून देशाची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली असल्याचे रामनाथ कोविंद यावेळी म्हणाले. विविध क्षेत्रातले प्रकल्प सांभाळण्याची जबाबदारी तसेच संरक्षण आणि दूरसंवादसारख्या महत्वाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी या प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे.

सर्वात मोठे टेलिकॉम जाळे असलेला भारत हा जगातला दुसरा देश आहे. गेल्या काही वर्षात टेलिकॉम क्षेत्रात आणि विशेषत: वायरलेस क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात या  क्षेत्राचे मोठे योगदान आहे. या सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावे असे राष्ट्रपती म्हणाले.

संरक्षण, संपत्ती विभागाचे अधिकारी देशातल्या संरक्षण क्षेत्राच्या जमिनींचे लेखा परिक्षण करतात. त्याशिवाय अतिक्रमण रोखणे, जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे आणि त्याचे जतन करणे हे काम त्यांच्याकडे असते. आज वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनींचा बिकट प्रश्न निर्माण झाला असून अशा स्थितीत आव्हानांचा सामना करत या जमिनींचे व्यवस्थापन केले जावे असा सल्ला राष्ट्रपतींनी या प्रशिक्षणार्थीना दिला.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1538363) Visitor Counter : 125


Read this release in: English