पंतप्रधान कार्यालय

शहरी पायाभूत सुविधांसाठीचा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न:

कल्याणकारी योजनांच्या फायद्याबाबत लाभार्थ्यांकडून घेतलेल्या माहितीचे साक्षीदार; जयपूरमध्ये जाहीर सभेला संबोधन

Posted On: 07 JUL 2018 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7  जुलै  2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयपूरमध्ये एका जाहीर सभेस संबोधित केले. राजस्थान राज्यासाठीच्या 13 नागरी पायाभूत प्रकल्पांचा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न झाला.

त्यानंतर त्यांनी, भारत सरकार आणि राजस्थान सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या निवडक लाभार्थ्यांतर्फे दृकश्राव्य कार्यक्रमातून केलेले अनुभव कथन पहिले. हे सादरीकरण राजस्थानच्या मुख्यमंत्री श्रीमती वसुंधरा राजे यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि अनेक इतर योजनांचा समावेश करून बनविले होते.

उत्साही आणि मोठ्या प्रमाणावर उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, राजस्थान मध्ये आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य आणि पाहुणचार राजस्थान कसा करतो याचा मी अनुभव घेत आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात राजस्थानने स्वतःची प्रगती किती व्यापक आणि वेगाने केली याचे खरे चित्र आजच्या राजस्थान मधून अभ्यागत पाहू शकतात.

 त्यांनी राजस्थानला धैर्यशील देश मानले. निसर्गाशी सुसंगत रहाणे किंवा आपल्या देशाचे रक्षण करणे, यासाठी राजस्थानने नेहमीच मार्ग दाखवला आहे, असेही ते म्हणाले.

राजस्थानच्या मुख्यमंत्री, श्रीमती वसुंधरा राजे यांच्या कामाची स्तुती करतांना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी राज्याची कार्य संस्कृती बदलली असून, केंद्र आणि राज्य सरकार मिळून राजस्थानच्या प्रगतीसाठी एकत्र काम करत आहेत.

 ते पुढे म्हणाले की, आज लाभार्थ्यांतर्फे करण्यात आलेल्या सादरीकरणातुन त्यांच्या सुख व आनंदाचे आज येथे उपस्थित असलेले सर्व साक्षीदार आहेत.

त्यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कसे कार्य करीत आहे याबाबत माहिती सांगितली. ते चालू खरीप हंगामात विविध पिकांच्या किमान पाठिंबा मूल्यात झालेल्या वाढीबाबत उपस्थितांशी बोलले. 

पंतप्रधानांनी राजस्थानमधिल विविध योजनांच्या प्रगतीचा उल्लेख केला, ज्यात स्वच्छ भारत मिशन, जन धन योजना, प्रधान मंत्री आवास योजना, मुद्रा योजना, उज्ज्वला योजनांचा समावेश आहे.

राजस्थानला पुढील वर्षी 70 वर्षे पूर्ण होत आहेत, हे सांगताना पंतप्रधानांनी विकसित राजस्थान निर्मितेच्या वचन बद्धतेला उजाळा दिला, जो नव भारताच्या निर्मितीत एक प्रमुख भूमिका निभावणार आहे.

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1538195) Visitor Counter : 83


Read this release in: English