पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी साधला तरुण आयएएस अधिकाऱ्यांशी संवाद
Posted On:
04 JUL 2018 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय प्रशासकीय सेवेतील 170 हून अधिक तरुण अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या सर्वांची अलिकडेच सरकारने सहायक सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. पंतप्रधानांनी त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कालावधीतला अनुभव सांगण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी त्यांच्याबरोबर लोक सहभाग, माहितीचा ओघ, संसाधनांचा योग्य वापर आणि प्रशासनातील लोकांचा विश्वास यासह सुशासनाच्या काही घटकांबाबत चर्चा केली.
ग्राम स्वराज अभियान, आयुष्मान भारत यांसारख्या अलिकडच्या प्रशासकीय उपक्रमांबाबतही चर्चा झाली.
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
N.Sapre/S.Kane/P.Kor
(Release ID: 1537815)
अभ्यागत कक्ष : 153